पावसाळ्यात लोणचं खराब होत असेल तर करा हे सहज सोपे उपाय

पावसाळ्यात लोणचं खराब होत असेल तर

पावसाळ्यात लोणचं खराब होत असेल तर… भारतीयांना जेवणाबरोबर लोणचं खायला किती आवडतं, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाहीये. एक वेळेस जेवणाच्या थाळीमध्ये भाजी नसली तरी चालेल, परंतु लोणचं मात्र असायलाच हवं असं अनेकांचं मत असतं. अनेक लोक वर्षभरासाठी लोणचं बनवूनही ठेवतात. मग कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, असे अनेक लोणच्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.

शक्यतो उन्हाळ्यात जेव्हा लोणचं बनवलं जातं, तेव्हा ते वर्षभर टिकेल या उद्देशाने बनवलेलं असतं. परंतु उन्हाळा संपताचं पावसाळा जेव्हा सुरू होतो, तेव्हा मात्र हे लोणचं खराब होण्याची शक्यता असते. लोणच्याला बुरशी लागू शकते आणि मग हे असं मेहनतीने बनवलेले लोणचं फेकून द्यावं लागतं. मग आपली मेहनत वाया जाऊ नये, इतक्या मेहनतीने बनवलेलं लोणचं फेकून द्यावं लागू नये, ते खराब होऊ नये, यासाठी काही उपाय आहेत. जे तुम्ही नक्कीचं करून पाहायला हवेत.

पावसाळ्यात लोणचं खराब होत असेल तर
पावसाळ्यात लोणचं खराब होत असेल तर

पावसाळ्यात लोणचं खराब होत असेल तर

लोणचं बनवण्याच्या आधी ज्या पदार्थापासून लोणचं बनवायचं, तो पदार्थ उन्हामध्ये चांगला सुकू घ्यायला हवा. म्हणजे त्यातील सगळं पाणी सुकून जातं आणि मग लोणचं खराब होण्याची शक्यता कमी होते.

तसंच लोणचं बनवताना आपण जे मसाले वापरतो, ते मसाले सुद्धा चांगले सुकवून घ्यायला हवेत म्हणजे लोणच्याचं आयुष्य आणखीन वाढू शकतं.

पावसाळ्यात लोणचं खराब होत असेल तर
पावसाळ्यात लोणचं खराब होत असेल तर

त्याचबरोबर जेव्हा लोणचं बनवलं जातं त्यामध्ये मिठाचा वापर करायला हवा आणि लोणचं पूर्णपणे तेलात बुडलेलं असायला हवं. म्हणजे त्याला बुरशी लागत नाही, लोणचं लवकर खराब होत नाही.

आपण लोणच्यासाठी एखादा डबा किंवा बरणी केलेली असते, परंतु जेवणाला बसल्यानंतर लोणच्याची आठवण येते. तेव्हा हे लोणचं काढण्यासाठी काहीजण हाताचा वापरही करतात. परंतु हे करणं चुकीचं आहे. लोणचं बाहेर काढण्यासाठी चमचाचा वापर करायला हवा, नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता वाढते.

पावसाळ्यात लोणचं खराब होत असेल तर
पावसाळ्यात लोणचं खराब होत असेल तर

वर्ल्डकपची ट्रॉफी टीम, कॅप्टन की क्रिकेट बोर्डाकडे ?

तर लोणचं बनवताना तुम्ही हे सर्व उपाय करून पाहतात का ? तुमचं लोणचं वर्षभर टिकत का की लवकर खराब होतं ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणतं लोणचं आवडतं, तेही सांगा. लिंबाचं, आंब्याचं, मिरचीचं की मिक्स लोणचं ?

आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top