दहावी आणि बारावीचा निकाल सध्या शाळेतील मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीक्षा दिल्यात. काही विद्यार्थ्यांचे निकालसुद्धा लागले आहेत. त्यामुळे सगळेजण मस्त एन्जॉय करताय. कुणी आपल्या घरी एन्जॉय करतंय. तर कोणी मामा, मावशीच्या किंवा आजी-आजोबाच्या घरी जाऊन मस्त सुट्ट्यांचा आनंद लुटतंय. परंतु दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं टेन्शन मात्र अजूनही कमी झालेलं नाहीये.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यातचं संपल्या. आता काही विद्यार्थी विविध कोर्स करताय. तर काही पुढील परीक्षांची तयारी करताय. परंतु दहावी आणि बारावीचा रिझल्ट कधी लागणार, हे टेन्शन त्यांच्या डोक्यात आहेचं.
दहावी आणि बारावीचा निकाल
दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे फक्त विद्यार्थीच नाही, तर त्यांचे पालक सुद्धा चातकासारखे डोळे लावून बसले आहेत. कारण या रिझल्टनंतरच पुढे भविष्यात कोणता कोर्स निवडायचा, कोणतं करिअर करायचं याबद्दलचा निर्णय त्यांना घेता येईल.
आणि आता दहावी आणि बारावीचा निकाल बद्दल खूप मोठी अपडेट समोर येत आहे. बारावीचा निकाल याच महिन्यात म्हणजे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. परंतु दहावीच्या निकालासाठी कदाचित मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जून महिन्याचा पहिला आठवडाही उजाडू शकतो.
SSC And HSC Board Exam Results
सध्या देशात आणि राज्यात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्याचाही परिणाम रिझल्टवर होऊ शकतो आणि निकालाची तारीख मागेपुढे होऊ शकते. आपल्याला माहितेय की, बारावीचा रिझल्ट आधी लागतो. परंतु दहावीचा रिझल्ट लागण्यास थोडा उशीरचं होतो.
पांढरं अंडं आणि ब्राऊन अंड्यामधला फरक माहितेय का ?
जर रिझल्ट लवकर लागला, तर पालक आणि विद्यार्थी या दोघांनाही भविष्यात करियर कोणतं निवडायचं, हे ठरवणं सोपं जातं.
तर तुम्ही दहावी आणि बारावीचा निकाल वाट पाहताय का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !