थोडं तुझं थोडं माझं मालिका शुक्रवार 21 जूनचा एपिसोड खूपच भारी झालाय. संपतराव अण्णासाहेबांच्या गाडीला मागे टाकून मंदिरात पोहोचतात. मंदिराची खूप छान सजावट केलेली असते. ढोल नगाडे वाजत असतात. त्यामुळे सगळ्यांनाचं खूप आनंद होतो. संपतराव आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मंदिरात पोहोचल्यावर गावकरी त्यांचं कौतुक करतात की, तुमच्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार शक्य झाला आहे.
थोडं तुझं थोडं माझं मालिका
तेवढ्यात अण्णासाहेब, मनस्वी आणि त्यांचं कुटुंब तेथे पोहोचतं आणि गावचे सरपंच त्यांना खूप मान देतात. त्यानंतर संपतराव आणि मानसी मंदिरात आल्यानंतर अण्णासाहेबांची आई म्हणजेचं मनस्वीची आजी मानसीचं खूप कौतुक करते. तुझा पहिला नंबर आला म्हणून तिला एकशे एक रुपये बक्षीस म्हणून देते. पण हे मनस्वीला सहन होत नाही आणि ती मानसीकडून जबरदस्तीने हे पैसे परत घेते.
तेजस हे सगळं पाहत असतो. त्यानंतर गावचे सरपंच संपतरावांचे आभार मानतात की, त्यांच्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार शक्य झाला. परंतु आरतीचा मान ते संपतरावांना नाही, तर चक्क अण्णासाहेबांना देतात. त्यामुळे संपतराव खूप चिडतात आणि जाब विचारतात की, मला आरतीचा मान का नाही ?
तेव्हा अण्णासाहेब संपतरावांना म्हणतात की, तुझ खानदान काय ? तुला जे आडनाव मिळालंय ते सुद्धा माझ्या बापानेचं दिलंय आणि तू आमच्या वीट भट्टीवर काम करणारा साधा कामगार होता. आज चार पैसे आले, म्हणून तू खानदानी होत नाही. तुझ्या बापाचं नाव काय आहे ? त्याचा पत्ता तरी आहे का ?
मुक्ताने चक्क सागरच्या गालावर किस केलं
या अपमानामुळे संपतराव खूप चिडतात आणि म्हणतात, जरी माझ्या खानदानाचा पत्ता नसला तरी सुद्धा हे सगळं मी कमावलंय. माझी मुलगी इतकी शिकलीये, हुशार आहे त्याचं काही नाही का . तर सरपंच म्हणतो, तुमची मुलगी हुशार आहे, शिकलीये पण तुमचं कुळ काय ? लग्नाच्या वेळेस तिचा कुळ विचारलं जाईल.
संपतराव खूप चिडतात आणि सगळ्या गावकऱ्यांसमोर म्हणतात की, मी माझ्या मुलीसाठी मी असं स्थळ आणेल की संपूर्ण गाव पाहत राहील आणि तेजस हे सगळं ऐकत असतो.
पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की, तेजस खोटा इन्कम टॅक्स ऑफिसर बनून संपत रावांना लुटण्याचा प्रयत्न करणार. मग तो यशस्वी होईल का ? हे जाणून घेण्यासाठी असेच नवीन नवीन अपडेट रोज पाहत रहा.
खूप खूप धन्यवाद !