थोडं तुझं आणि थोडं माझं येत्या 17 जूनपासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होतेय. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती मालिकेत मानसी हे पात्र साकारताना दिसणार आहे. कॉलेजमध्ये जाणारी ही तरुणी खूपच हुशार, स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे.
काही दिवसांपूर्वी या मालिकेचा जबरदस्त प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला. या प्रोमोला प्रेक्षकांचा अतिशय चांगला प्रतिसादही मिळाला. तब्बल 9 वर्षांनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे पुन्हा एकदा टीव्ही मालिकेत दिसणार असल्यामुळे तिचे फॅन्स खूप खुश झाले आहेत.
थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतील प्रमुख अभिनेता
पण सर्व प्रेक्षकांना हाच प्रश्न पडला होता की अभिनेत्री शिवानी सुर्वेसोबत कोणता अभिनेता हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कारण मालिकेच्या प्रोमोमध्येही याबद्दल कोणतीही माहिती दिली गेली नव्हती. पण आता एका इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून या मालिकेत कोणता अभिनेता दिसणार ते समोर आलं आहे. लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे हा ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत शिवानी सुर्वेसोबत दिसणार आहे.
Thoda Tujha Thoda Majha Star Pravah Serial
अभिनेता समीर परांजपे याआधी ‘सुंदरा मनामध्ये भरली‘ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता. यासोबतच त्याने ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्येही सहभाग घेतला होता. समीर परांजपे आणि शिवानी सुर्वे ही फ्रेश जोडी लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. याबद्दल वाहिनीकडून किंवा स्वतः समीरकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण लवकरच याबद्दल आपल्याला अधिकृत माहिती मिळेल.
अभिनेता समीर परांजपे या मालिकेत दिसणार असेल तर त्याच्या फॅन्ससाठी खूपच आनंदाची बातमी आहे. यासोबतच समीर परांजपे आणि शिवानी सुर्वेची एकदम फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल त्यामुळे सगळे खूपच आनंदात आहेत. अभिनेत्री मानसी कुलकर्णी या मालिकेत गायत्री मॅडमच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच मालिकेत अजून कोणकोणते कलाकार दिसणार आहेत हेसुद्धा लवकरच समोर येईल. प्रोमो पाहिल्यापासून या मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे आणि मालिकेची सगळे आतुरतेने वाट पाहताय.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !