ठरलं तर मग आजचा भाग. या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट येणार होता, हे तर आपल्या सगळ्यांना माहीतये. प्रियाला कळलं की, अर्जुनच्या केबिनमध्ये सायली आणि अर्जुनच्या कॉन्टॅक्ट मॅरेजची फाईल आहे. त्यामुळे प्रिया अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेली. तिला तिथे गेल्यानंतर फाईल असलेल्या ड्रॉवरची चावी सापडली आणि या चावीची डुप्लिकेट चावी तिने बनवून घेतली.
प्रिया मध्यरात्री ऑफिसमध्ये जाऊन अर्जुनच्या ड्रॉवरमधून त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरते, हे आपल्या सर्वांना माहीत होतं आणि त्यानंतर ती पूर्णा आजीजवळ येऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार. यामुळे अर्जुन आणि सायलीचं बिंग फुटेल, त्यांचं काही खरं नाही असं सगळ्यांना वाटत होतं.
ठरलं तर मग आजचा भाग
परंतु मालिकेमध्ये त्यापेक्षाही एक खूप मोठा ट्विस्ट आलाय आणि प्रियाचा डाव तिच्यावरचं उलटला आहे. कारण घडलं असं की जेव्हा प्रिया अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन ऑफिसमधून पळून जात होती, त्याचवेळेस अर्जुनने तिला पाहिलं. त्याने ही गोष्ट सायलीला सांगितली आणि मग हे दोघेही रविराजच्या घरी पोहोचले.
रविराजच्या घरी गेल्यानंतर त्यांनी प्रियाच्या रूममधून ही खरी फाईल चोरली आणि तेथे खोटी फाईल ठेवली. परंतु प्रियाला हे माहीतच नव्हतं. अतिउत्साहात ती ही फाईल चेक केल्याशिवाय पूर्णा आजीला सगळं सत्य सांगण्यासाठी पोहोचली. तिथे गेल्यावर तिने अर्जुन आणि सायलीचं सत्य सगळ्यांना सांगितलं. या दोघांचं लग्न खरं नाहीये, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय.
ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल तिने पूर्णा आजीच्या हातात दिली आणि तिला असं वाटलं की, आता आजी सायली आणि अर्जुनच्या थोबाडीत मारतील. साईलीला घराबाहेर हाकलतील आणि आपलं लग्न अर्जुनबरोबर होईल. परंतु घडलं उलटंच. आजीने सायलीच्या नाही तर चक्क प्रियाच्या सणसणीत थोबाडीत मारली. त्यामुळे प्रियाच्या पायाखालची जमीनचं सरकली. तिचा विश्वासचं बसत नव्हता की नेमकं काय झालंय.
लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत मोठा ट्विस्ट
प्रियाला जेव्हा ही फाईल दिसेल, तेव्हा तिला कळेल की, ही खरी फाईल नाहीये. तेव्हा मात्र तिला सगळं सत्य समजणार, पण वेळ निघून गेलेली असेल. प्रिया खोटारडी ठरलेली असेल.
खूपच जबरदस्त ट्विस्ट या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही सुद्धा ठरलं तर मग मालिकेतील हा ट्विस्ट पाहायला एक्साईटेड आहात ना ? नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !