चला हवा येऊ द्या शो बंद झाल्यावर अभिनेत्री श्रेया बुगडे आता काय करते ?

चला हवा येऊ द्या शो बंद झाल्यावर अभिनेत्री श्रेया बुगडे आता काय करते ?

चला हवा येऊ द्या हा कॉमेडी शो प्रेक्षकांचा खूपच लाडका होता. या शोमधील सर्वच हास्यकलाकार प्रेक्षकांचे अतिशय आवडते बनले होते. डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांना आपल्या कॉमेडीने हसवून हसवून वेड लावलं होतं. पण तब्बल दहा वर्षे प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केल्यानंतर या शोने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

प्रेक्षक या शोला प्रचंड मिस करत असतात. पण या शोनंतर यातील कलाकारांनी आपला वेगळा मार्ग निवडला आहे आणि ते त्यावर कामदेखील करत आहेत. डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम हे आपल्याला ‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे !’ या नवीन कॉमेडी शोमध्ये दिसणार आहेत. कुशल बद्रिके हा सोनी टीव्हीच्या ‘मॅडनेस मचाएंगे’ या शोमध्ये दिसतोय.

Gaurav More To Feature In Sony TV's Hindi Comedy Show

चला हवा येऊ द्या 

भारत गणेशपुरे हे झी मराठीवरील ‘शिवा‘ मालिकेत भूमिका साकारताय. सागर कारंडेसुद्धा ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात काम करतोय. त्याच्या या नाटकाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.

याशिवाय श्रेया बुगडेनेसुद्धा आपलं नवीन काम सुरू केलं आहे. ती सध्या रेडिओ जॉकी म्हणून काम करतेय. ती आपल्या फॅन्ससाठी रेडिओवर एक नवीन कार्यक्रम घेऊन आलीय. श्रेया बुगडे बिग एफएमवर ‘बिग हा हा हा कार’ हा कार्यक्रम सादर करतेय. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येतो.

श्रेया बुगडे
श्रेया बुगडे

Shreya Bugde In Chala Hawa Yeu Dya  

काही दिवसांपूर्वी श्रेयाने याबद्दल एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्या व्हिडिओवर कमेंट करत अनेक फॅन्सनी तिला या नवीन कामासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. याशिवाय श्रेयाने आपलं नवीन रेस्टॉरंटदेखील सुरू केलं आहे. तिने ‘द बिग फिश अँड कंपनी’ हे सी फूडसाठी स्पेशल रेस्टॉरंट मुंबईच्या दादर भागात सुरू केलंय.

पान टपरीवाला भाऊ कदम कसा बनला कॉमेडीचा बादशाह

चला हवा येऊ द्या‘ या शोने निरोप घेतल्यानंतर फॅन्सना आपल्या आवडत्या कार्यक्रमाची आणि त्यातील कलाकारांची खूप आठवण येतेय.

चला हवा येऊ द्या
चला हवा येऊ द्या

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top