आवळा शेती मित्रांनो सध्या अनेक प्रगत शेतकरी नेहमीच्या पारंपरिक पिकांची शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करताय आणि शेतीतून वेगवेगळ्या संधी शोधून काढताय. अनेक शेतकरी शेतीत नवीन प्रयोग करून चांगली आर्थिक प्रगतीसुद्धा करताय.
अशीच एक यशोगाथा शेतकरी बाळासाहेब वाळुंज याचीही आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेतात आवळ्याची शेती केली आणि त्यातून त्यांनी लाखो रुपयेसुद्धा कमावताय.
आवळा शेती
बाळासाहेब वाळुंज हे शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचे आहेत. त्यांनी पारंपरिक पिकांऐवजी आपल्या शेतात आवळा शेती लागवड करायचं ठरवलं. सर्वप्रथम 2000 साली त्यांनी आपल्या चार एकर शेतात आवळ्याची 600 झाडे लावली होती.
त्यानंतर 2007 सालापासून त्यांना या झाडापासून आवळ्याचं उत्पादनसुद्धा मिळायला लागलं. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतातला आवळा बाजारात विकण्याचा प्रयत्न केला पण बाजारात आवळ्याला चांगला भाव मिळाला नाही त्यामुळे त्यांनी आपल्या शेतातील आवळ्यापासून काही नवीन प्रोडक्टस तयार करण्याचा विचार केला.

पण आवळा शेती हे प्रोडक्टस कसे तयार करायचे याबद्दल त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्यांना याबद्दल शिकून घेण्याची खूप ईच्छा होती.
यावेळी त्यांच्या मदतीला आलं ते राहुरीचं कृषी विद्यापीठ. त्यानंतर बाळासाहेब वाळुंज यांनी राहुरीच्या कृषी विद्यापीठातून आवळ्यावर प्रक्रिया करून त्यापासून नवनवीन प्रोडक्टस बनवायचं प्रशिक्षण घेतलं आणि घरच्याघरीच त्यांनी हे प्रोडक्टस बनवायला सुरुवात केली.
आवळा शेतीचा प्रयोग
आवळा शेती अमृत रस, आवळा कँडी, आवळ्याचं लोणचं असे अनेक प्रोडक्टस त्यांनी आवळ्यापासून बनवले.
प्रत्येक व्यवसायाप्रमाणे बाळासाहेब वाळुंज यांनाही त्यांच्या व्यवसायात सुरुवातीला खूप अडचणी आल्या. पण त्यांनी सर्व अडचणींचा सामना करत आपलं काम सुरू ठेवलं आणि आपल्या अविरत प्रयत्नांनी यश मिळवून दाखवलं. त्यांच्या या 23 वर्षांच्या प्रवासात त्यांना पत्नीचाही खूप सपोर्ट मिळाला.
कोरफड शेती कमावून कमवा दरमहा लाखों रुपये
त्यांनी बनवलेले पदार्थ हे घरगुती बनवलेले, चांगल्या क्वालिटीचे आणि स्वस्त असतात त्यामुळे कालांतराने त्यांच्या प्रोडक्टसना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांचा व्यवसाय छान चालू लागला. चांगल्या दर्जाच्या प्रोडक्टसमुळे त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादित केलाय.
या व्यवसायातून ते एका वर्षात 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतात.
बाळासाहेब वाळुंज या प्रगत शेतकऱ्याने आपल्या व्यवसायातून सर्वांसमोर खूपच उत्तम उदाहरण ठेवलं आहे.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा धन्यवाद.