अमृता खानविलकर नवरा कोण आहे ? अमृता नवऱ्याचे फोटो का शेअर करत नाही ?

अमृता खानविलकर नवरा

अमृता खानविलकर नवरा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकरने नेहमीच आपल्या उत्तम अभिनयाने रसिकप्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मराठी असो की हिंदी तिच्या चित्रपटांची लिस्ट खूप मोठी आहे. यासोबतच तिने काही मालिकां मध्येही काम केलंय. उत्तम अभिनेत्री सोबतच ती एक जबरदस्त डान्सरसुद्धा आहे. आपल्या उत्तम अभिनयकौशल्याने तिने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे.

अमृता अभिनयक्षेत्रासोबतच सोशल मीडियावरही खूपच लोकप्रिय आहे. तिचे लाखोंमध्ये फॉलोअर्सदेखील आहेत. अमृता ही आपल्या फॅन्ससाठी नेहमी सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जेव्हा तिला कोणी ट्रोल करतं तेव्हा ती जशास तसं उत्तर देतानाही दिसून येते. पण अनेकवेळा लोक अमृताला हाच प्रश्न विचारतात की अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबतचे फोटो सोशल मीडियावर का टाकत नाहीस ?

अमृता खानविलकर नवरा 

अमृताने हिंदी टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केलं आहे. या दोघांची जोडी फॅन्सना खूप आवडते. दोघांना सोबत जोडीने पाहण्यासाठी ते खूप उत्सुक असतात.

नुकताच अमृताला हिमांशूसोबतचे फोटो सोशल मीडियावर का शेअर करत नाहीस हा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आला तेव्हा तिने खूप छान उत्तर दिलं.

अमृता खानविलकर नवरा
अमृता खानविलकर नवरा

ती म्हणाली की, आमचे फॅन्स हे आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत असं मला वाटतं. काहींना तुम्ही आवडता तर काहींना आवडत नाही. जोपर्यंत ते तुमच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करत नाही तोपर्यंत सगळं ठीक आहे. लोक माझ्या कामाबद्दल, मी इंस्टाग्रामवर जे शेअर करते त्याविषयी बोलतात तोपर्यंत सगळं ठीक आहे. पण ते जेव्हा मला, माझ्या कुटुंबाला किंवा मला आणि हिमांशूला ट्रोल करतात तेव्हा मला ते आवडत नाही.

Amruta Khanvilkar Husband

मी हिमांशूबद्दल (अमृता खानविलकर नवरा) काही पोस्ट करत नाही, कारण मला त्याला या सगळ्यापासून लांब ठेवायचं आहे. माझ्यासाठी त्याच्याविषयी सगळं काही शेअर करण्यापेक्षा त्यांचा बचाव करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तो या इंडस्ट्रीतून नाही. कोणत्याही ट्रोलिंगला आणि द्वेषासाठी तो पात्र नाही. या सगळ्यामुळे त्याला दुःख होऊ शकतं. या गोष्टीची मी नेहमीच काळजी घेते आणि पुढेही घेत राहीन.

शरयू सोनवणेने लग्नाबद्दल केला खुलासा

मी हिमांशू (अमृता खानविलकर नवरा) आणि माझे जास्त फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही त्यामुळे मला ट्रोल करण्यात आलं. पण मी माझ्या आईवडिलांकडे पाहते, जे गेल्या 45 वर्षांपासून आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. त्या दोघांचे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर एकही फोटो नाही. मलाही तेच करायचं आहे.

अमृता खानविलकर नवरा
अमृता खानविलकर नवरा

मी जुन्या विचारसरणीची आहे. मी आणि हिमांशू एकमेकांना तेव्हापासून ओळखतो, जेव्हा इंस्टाग्राम नव्हतंच. 2004 सालापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. तेव्हा आम्ही कॅमेऱ्यात फोटो काढायचो. आम्हाला एकमेकांना सुरक्षित ठेवायचं आहे आणि एकमेकांची ओळख जपायची आहे. या शब्दात अमृताने आपल्या भावना व्यक्त केल्या.

अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या नवऱ्याला काही त्रास होऊ नये आणि त्याचा बचाव करण्यासाठी त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही असं तिने म्हटलं आहे. 

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top