अभिनेत्री धनश्री भालेकर ही सध्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत फाल्गुनी ही भूमिका साकारतेय. तिची ही नवीन भूमिका प्रेक्षकांना फारच आवडतेय. याआधी ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत सुहानीची भूमिका साकारताना दिसली होती. याशिवाय तिने अनेक मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केलंय.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री धनश्री भालेकर चया आईचं दुःखद निधन झालं होतं. तेव्हा तिने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या फॅन्सना माहिती दिली होती. आता तिने आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करत पुन्हा एकदा आईच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय.
अभिनेत्री धनश्री भालेकर
या पोस्टमध्ये तिने लिहलंय की,
आई
अश्या अनेक गोड आठवणींचा खजिना आहे माझ्याजवळ माझ्या phone galleryमध्ये. प्रत्येक फोटो पाहताना त्याची एक वेगळी story आठवते पर्यायाने पुन्हा एक नविन आठवण.
त्यादिवशी बाराव्या दिवशीच्या पूजेसाठी तुझा photo frame करून आणला तेव्हा एकदम जाणवलं की एखाद्याचं पूर्ण आयुष्य एका फोटोपूर्त सीमित होऊन जातं. यापेक्षा भयंकर होता तो दहाव्या दिवशी आलेला अनुभव. पूजा विधी झाल्यानंतर, अस्थी विसर्जन करण्यासाठी त्या पुन्हा भरताना जेव्हा ती हाडं माझ्या हाताला लागली तेव्हा एकदम अंगावर शहारे आले आणि जाणवलं की मुलांनी आपल्या पालकांचे अस्थी विसर्जन किंवा स्पर्श होणं किती भीषण वास्तव आहे. पण त्यानंतर अगदी पाचव्या सेकंदाला जेव्हा कावळा पिंडाला शिवला आणि गुरुजी म्हणाले की पुण्यवान होती तुमची आई आणि शांततेत गेली तेव्हा वाटलं खरंच आहे तू नेहमीच म्हणायची की मरण स्वतः स्वीकारता यावं आणि तू त्याचे ही काटेकोर पालन केलेस. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हसून गप्पा मारत गेलीस पण तरी मला अजूनही असच वाटतं आई की जरा घाई केलीस.
इतक्या गोष्टी मी बोलत असते तुझ्याशी पण तू उत्तर देत नाही हल्ली, स्वप्नात येऊन गप्पा मारत बसतेस.
हो…..य !
मला माहिती आहे आई, मी असं घरी बसून राहणं तुला अजीबात आवडत नाही, कधीच आवडायचं नाही… सुरू करणार आहे पुन्हा कामं, थोडा माझा माझा वेळ घेत होते.
आता तर तुझं स्वप्नं पूर्ण करणं हे ध्येय आहे actually आपलं दोघींचं स्वप्नं म्हणजे तू आहेस तिथे तुला माझा अभिमान वाटेल | promise आई, पण आता हे सगळं तुझ्याशिवाय करायचं आहे त्यामुळे मला tension आलं आहे म्हणून तू तुझा आशर्वाद सतत माझ्या पाठीशी ठेव.
एकटं एकटं वाटतंय, actually खुप एकटं वाटतंय, खुप आठवण येते, एकदम रिकामी झाल्यासारखं, एकटी पडले आहे ग… पण आपण स्वप्नात गप्पा मारत राहू कारण तुझ्याशी बोलल्याशिवाय माझा दिवस पूर्णझाल्यासारखा नाही
वाटत मला.
Love You आई & I Miss You a lotttttt.
तुझेचं मी गीत गात आहे मालिकेचे कलाकार
अभिनेत्री धनश्री भालेकर ने या शब्दांत आपल्या आईबद्दलचं प्रेम आणि मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी तिचं सांत्वन केलं आहे.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !