समीर चौघुलेच्या बायकोला पाहिलंत का ? हास्य अभिनेता समीर चौघुले हे आपल्या जबरदस्त कॉमेडीमुळे रसिकप्रेक्षकांचे खूपच लाडके बनले आहेत. त्यांच्यामध्ये प्रेक्षकांना हसवण्याचं जबरदस्त टॅलेंट आहे. मागील अनेक वर्षांपासून ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. ते विनोदी अभिनयासोबतच लेखनसुद्धा करतात. त्यांच्या लेखणीतून अनेक उत्तमोत्तम विनोदी स्कीट्स ते साकारत असतात.
याशिवाय त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्येही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे आणि मृण्मयी देशपांडेच्या ‘चंद्रमुखी‘ चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. लवकरच ते ‘गुलकंद’ या मराठी चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात प्रसाद ओक, सई ताम्हणकर, इशा डे हे कलाकारही दिसणार आहेत.
समीर चौघुलेच्या बायकोला पाहिलंत का ?
त्यांनी वस्त्रहरण, यदा कदाचित या नाटकांमध्येही काम केलंय. त्यांच्या उत्तम अभिनयाचे असंख्य फॅन्स आहेत.
समीर चौघुले हे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. ते नेहमी आपल्या पर्सनल लाईफबद्दल आणि कामाबद्दलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहतात.
आज समीर चौघुले यांची पत्नी कविता चौघुलेंचा वाढदिवस आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त समीरने इंस्टाग्रामवर आपल्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केलाय आणि पोस्ट लिहत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
त्यांनी या पोस्टमध्ये लिहलंय की,
कविता चौघुले हॅपी बर्थडे…तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी देवाचे आभार…तुझ्या विना माझं सतत ‘अडण’ असच कायम राहू दे…खूप प्रेम तुला…बायकोचा वाढदिवस
समीर चौघुलेंनी या शब्दात आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी आणि अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !