अंडी खरी की प्लास्टिकची कसे ओळखाल ? सगळीकडेचं थंडीचा कडाका सुरू झाला आहे आणि थंडीपासून वाचण्यासाठी आपण अनेक उपायही करत असतो. त्याचबरोबर आरोग्य सुधारण्यासाठीही लोक विविध पदार्थांचे सेवन करतात, असाच एक पदार्थ म्हणजे अंडी.
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, हे वाक्य तर आपण अनेकदा ऐकलं असेल. अंडी ही शरीरासाठी, आरोग्यासाठी नक्कीचं चांगली असतात. परंतु तुम्ही खात असलेलं अंड हे खरं आहे की प्लास्टिकचं ? हा विचार तुम्ही कधी केलाय का ? आजकाल बाजारात खोटी प्लास्टिकची अंडी आली आहेत, हे तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. परंतु तुम्ही घरात जी अंडी खाताय, ते खरं की प्लास्टिकचं हे कसं ओळखाल ? यासाठी आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत.
अंडी खरी की प्लास्टिकची कसे ओळखाल ?
तुम्ही जेथून अंडी खरेदी करतात, तेथेच तुम्ही हे चेक करू शकतात की, अंडी खरी आहेत की प्लास्टिकची ? यासाठी अंडीला स्पर्श करून पहा. खरी अंडी ही मऊसर असतात, तर प्लॅस्टिकची अंडी खरबूडी लागू शकतात.
अनेकदा दुकानात असल्यावर तुम्हाला हा फरक समजणार नाही, मग घरी आणल्यावर अंड खरं की प्लास्टिकचं हे कसं ओळखायचं ? यावेळेस अंडी कानाजवळ आणून थोडी हलवून पहा, खरी असली तर काहीच आवाज येणार नाही. तर प्लास्टिकच्या अंडीतून तुम्हाला आवाज येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024
अजूनही तुम्हाला फरक कळालं नसेल, तर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे गॅस चालू करून मंद आचेवर अंडी थोडी गरम करा. अंड जर प्लास्टिकचं असेल तर प्लॅस्टिक जळाल्यामुळे त्यामधून जो दुर्गंध येतो, तो तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि अंडी खोटी आहेत हे तुम्हाला समजेल. दुर्गंध न आल्यास तुम्ही खरं आणि योग्य अंड खात आहात, हेही तुमच्या लक्षात येईल.
तर यानंतर या सर्व उपाययोजना केल्यानंतरच अंडी खाण्याचा निर्णय घ्या. कारण खरी अंडी आरोग्यासाठी जेवढी उपयोगी आहेत, तेवढीच प्लास्टिकची अंडी ही तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाहीत.
अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद!